Our Achievement

द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक व अँग्री सर्च इं.प्रा.लि यांच्या विद्यमाने आयोजित द्राक्ष उत्पादक चर्चासत्र आणि ॲग्रोजय ॲप शुभारंभ

द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक व अँग्री सर्च इं.प्रा.लि यांच्या विद्यमाने आयोजित द्राक्ष उत्पादक चर्चासत्र आणि ॲग्रोजय ॲप शुभारंभ या कार्यक्रमानिमित्त अँग्री सर्च इं.प्रा.लि,पिंपळनारे, दिंडोरी येथे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी द्राक्ष उत्पादक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते आणि शेतकरी बांधवांसाठी शेतीविषयक मोफत सल्ला देणारे ॲग्रोजय ॲप चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मान्यवर म्हणून श्री. अजित इंगळे सर, डॉ. ओमप्रकाश हिरे, आणि ॲग्रोजय ॲप चे श्री.कृष्णा हांडगे सर हे उपस्थित होते. त्यानंतर ॲग्रोजय बद्दलची संपूर्ण माहिती श्री.कृष्णा हांडगे सर यांनी समजून सांगितली. श्री.अजित इंगळे सर यांनी द्राक्ष पिकांमधील खोड किड्यांचे नियंत्रण याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. डॉ. ओमप्रकाश हिरे सर यांनी खरड छाटणीतील काडी पक्वता या विषयावर शेतकर्‍यांना माहिती दिली. अशाप्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत होवून कार्यक्रमाची सांगता झाली.