जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाउनच्या (सॅल्युट टू सायलेंट वर्कर्स) या कार्यक्रमानिमित्त जेसी आयतर्फे हॉटेल करी लिव्हज, पिंपळगाव येथे कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सम्मान पत्र व गुलाबपुष्प देवून सम्मानित करण्यात आले. यामध्ये कृषी क्षेत्रात जास्त उत्पन्न काढणाऱ्या,, फुल शेती, द्राक्षशेतीत निर्यात करणार्या महिला शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय व्याख्याते झाकीर हुसेन होते.अध्यक्षस्थानी डॉ.सुधीर बांबर होते. याप्रसंगी महिला शेतीमित्र पुरस्कार रागिने आगळे राणी गणोरे यांना तर युवा शेतीमित्र पुरस्कार माणिक शिंदे पोपटराव गवळी साहेबराव गोवर्धने यांना तर तांत्रिक शेती पुरस्कार कृष्णा हांडगे यांना व सेंद्रिय शेती पुरस्कार संजय पवार यांना देऊन या संस्थेचे इंटरनॅशनल ट्रेनर झाकीर हुसेन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुधाकर काकडे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष केशव बनकर,संतोष शिरसाठ, विकास शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.